किनगाव बुद्रूक श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कोरोना योद्धांचा सत्कार

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव बुद्रूक येथील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिक काकड आरतीनिमित्त कोरोना योद्धा ग्राम पंचायत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना काळात ग्राम पंचायतीचे कर्मचारी,पाणीपुरवठा व सफाई कर्मचारी यांनी उत्तम प्रकारे सेवा बजावली यात अपंग व्यक्तींना सॅनिटायझर व मास्क ग्रामपंचायत मार्फत वाटप केले. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे ग्रामपंचायत कर्मचारी कामगार प्रदीप जोशी, नाना पाटील, संदीप रोहिदास पाटील, सुरेश साळुंखे, संदीप राजू पाटील, रमेश कोळी, विठ्ठल धांडे, जगदीश कंडारे, गौतम कंडारे, भिका रल,राजू जावा,व राकेश कंडारे यांचा श्रीराम मंदिरात सत्कार करण्यात आला.

 

कोरोना रूग्णांची उत्तम प्रकारे देखभाल केली व त्यांना रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात पाठवणे ज्या ठिकाणी कोरोनाची लागण झालेला रूग्ण आढळला त्या घराजवळील परीसर बंद करून प्रतिबंधीत क्षेत्र करणे, कोरोनाचा बाधीत असलेल्या रुग्णास रूग्णालयात दाखल करणे तसेच गावात माक्स, सॅनिटायझर वाटप करणे स्वतःच्या जिवाची परवा न करता अखंडपणे कार्य करून सर्वसामान्य नागरीकांमध्ये जनजागृतीचे कार्य करीत आहेत. तसेच गावातील गटारींची घाण केरकचरा साफसफाई करीत आहेत. नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन गावात स्वच्छता सुव्यवस्था राहावी तसेच पाणीपुरवठा कर्मचारीदेखील रात्रंदिवस पाणीपुरवठा नियोजन करीत २४ तास सेवा देत आहेत व यापुढेही देत राहतील म्हणून श्रीराम मंदिर ट्रस्ट तर्फे या सर्व कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. कर्मचाऱ्यांना सत्कारार्थी आयोध्या येथील श्रीराम मंदिराचा फोटो प्रतिमा, रुमाल, टोपी, नारळ व ५१ रुपये देऊन सत्कार करण्यात आला.

Protected Content