Home Cities जळगाव माणियार विधी महाविद्यालयाच्या नवीन प्रशस्त इमारतीचे भूमिपूजन

माणियार विधी महाविद्यालयाच्या नवीन प्रशस्त इमारतीचे भूमिपूजन

0
106

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणात एस.एस.मणियार लॉ कॉलेजच्या नवीन प्रशस्त इमारत भूमिपूजन सोहळा नुकताच खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव अँड.एस.एस.फालक व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

अत्यंत अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त ५० हजार स्क्वेअर फुट जागेत पाच मजली इमारत उभारण्यात येणार आहे. यावेळी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष अँड.प्रकाश पाटील,खजिनदार ज्ञानदेव पाटील, सहसचिव अँड.प्रमोद पाटील, हरीश मिलवाणी, सुधीर बेंडाळे, व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, व्यवस्थापन सदस्य, पदाधिकारी आणि विविध शाखेचे संचालक, प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.


Protected Content

Play sound