मुंबई (वृत्तसंस्था) काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझीही ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटना आता राजकीय संघटना झाली आहे. संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो. त्याला जास्त कळते असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात होती. करोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केले. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभा राहिलो आहे. परंतू काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझे कौतुक केले पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतक्या टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी सांगितलं.