माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्पासाठी साहित्य वाटप

 

जामनेर, प्रतिनिधी । “माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात होणार असुन.गटविकास अधिकारी जे.व्ही.कवडदेवी यांच्या हस्ते मोहिमेसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

१४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत “माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात होणार आहे. या मोहिमेसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.समाधान वाघ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.स्वाती पाटील, बशीर पिंजारी, आशा कुयटे, सर्व आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, गटप्रवर्तक उपस्थित होत्या. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक, आरोग्य कर्मचारी व प्राथमिक शिक्षक यांच्या टीम द्वारा करण्यात येणार आहे.

यामध्ये कोमॉरबीड व ज्यांना काही त्रास आहे त्यांची रक्तातील ऑक्सिजनची पातळी व थर्मलगन द्वारा तापमान मोजण्यात येणार आहे. जामनेर तालुक्यात विशेष मोहिमेद्वारे सर्व माध्यमिक, प्राथमिक शिक्षक,अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी व सर्व शासकीय कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. सर्व आरोग्य विभागाने कोरोना काळात केलेल्या कामाविषयी त्यांनी विभागाचे कौतुक केले. सर्व आरोग्य सहाय्यकांचे गटविकास अधिकारी व गटप्रवर्तक आणि आरोग्य सहाय्यिकांचा सत्कार डॉ.समाधान वाघ व डॉ. राजेश सोनवणे यांचा हस्ते करण्यात आला.

Protected Content