माझी वसुंधरा अभियानासाठी जिल्ह्यातील १२ गावांची निवड

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेतर्फे माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे.

पर्यावरण रक्षणाशिवाय माझी वसुंधरा अभियान जिल्हा परिषदेमार्फत प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. यावर पालक अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यत हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती अमंलबजावणी अधिकारी के. बी. रणदिवे यांनी दिली.

याची सुरुवात शासकीय कार्यालयातून केली जाणार आहे. शासकीय कार्यालयांतील ऊर्जा व पाण्याचा वापर, पाण्याचे ऑडिट, अडगळीतील सामानाचे व्यवस्थापन, कार्यालयाच्या परिसरातील वृक्षसंपदा यावर काम केले जाणार आहे. स्वच्छता अभियान, जलसंधारण, सौरऊर्जा अशा विविध योजनांच्या अभिसरणातून विविध उपक्रम राबवून अभियानास गती देण्यात येणार आहे. स्वच्छता, जैवविविधता जपण्यासह, हरितपट्टे तयार करणे, कचर्‍याचे विलगीकरण, सायकल ट्रॅक उभारणी, देशी झाडांचे रोपण, अर्बन फॉरेस्ट, सायकल शेअरिंग, वृक्षापरोपण, कांदळवनांचे जतन व संवर्धन, धुळीचे प्रमाण कमी करणे, नदी व तलावांचे व नाल्यांचे पुनरुज्जीवनचे नियोजन करणार आहेत.

Protected Content