माझाही फोन टॅप करण्यात आला होता, एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं खळबळ

 

 

जळगावः प्रतिनिधी । आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला  फोन टॅपिंगवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. त्यातच  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांचाही फोन टॅप करण्यात आल्याची माहिती दिलीय. मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी फोन टॅप करण्यात आल्याचं सांगितलंय.

 

मंत्रिमंडळामधून मला राजीनामा द्यायला लावला, तेव्हापासून माझा फोन टॅप केला जातो, असा मला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना त्या कालखंडात मी आधी माझा फोन टॅप होत होता, अशी मुलाखत दिली होती. त्यामुळे तेव्हापासून माझी तक्रार आहे. त्यावेळेस माझ्या तक्रारीनंतर ॲडिशनल चीफ सेक्रेटरीनी चौकशी केली होती, त्या कालखंडापासून तर आतापर्यंत मला शंका आहे की माझा फोन टॅप होत होता. तसे मला जाणवत होते. त्यामुळे त्यातील तथ्य काय आहे हे सांगणायची मी सरकारला पत्राद्वारे विनंती करणार असल्याचंही एकनाथ खडसेंनी सांगितलंय.

 

फोन टॅपिंगच्या माध्यमातून राज्यातील काही नेते, पोलीस अधिकारी आणि इतर व्यक्तींची संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या सगळ्याची इत्यंभूत माहिती फडणवीस यांच्या हाती लागली होती. हा डेटाबॉम्ब घेऊन देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे गेले होते.  केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी, असा आग्रह आता भाजपने धरला आहे. त्यामुळे आता सावध झालेल्या ठाकरे सरकारने प्रत्येक पाऊल जपून टाकायचे ठरवले आहे.

 

 

फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केला. मी सीताराम कुंटे यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, असे मला वाटते. तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिका यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

 

 

Protected Content