माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय निवृत्ती केली जाहीर

औरंगाबाद (वृत्तसंस्था) आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असा व्हीडीओ संदेश देत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

हर्षवर्धन जाधव यांनी निवृत्ती जाहीर करताना सांगितलं आहे की, लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो,असे व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी मनसे मध्ये प्रवेश केला होता. एकदा मनसे तर एकदा शिवसेनेकडून कन्नड मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Protected Content