‘वाईन विक्री’ विरोधात आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय रविवारी घेणार – अण्णा हजारे

अहमदनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । ‘दुकानात वाईन विक्री’ या विषयावर विविध स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजसेवक अण्णा हजारे हेसुद्धा या विषयावर आंदोलन करणार असल्याचं बोललं जात असतांना आंदोलन करायचं की नाही हा निर्णय रविवारी घेणार असल्याचं हजारे यांनी सांगितलं आहे.

‘वाईन विक्री’ विरोधात अण्णा हजारे यांनी उपोषण करणार असल्याचे सूचक विधान केले होते. विधानानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची भेट घेऊन यावर तीन तास चर्चा केली. त्यावर आपलं ५० टक्के समाधान मत व्यक्त करत अण्णा हजारे यांनी उपोषणासंबंधी रविवारी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांना आज अण्णांसोबत झालेल्या बैठकीत यश आल्याचं दिसून येत असून यात अण्णांचं काही प्रमाणात समाधान झाल्याचं वृत्त आहे. नायर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपलं ५० टक्के समाधान झाल्याचं सांगत उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.

Protected Content