माजी आमदार डॉ. सुरेश पाटील कालवश

चोपडा प्रतिनिधी । काँगेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीपभैय्या पाटील यांचे वडील तथा माजी आमदार डॉ. सुरेश जी. पाटील यांचे ( वय ९५) आज वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, राजकीय, सामाजिक व शैक्षणीक क्षेत्रातील एक महनीय व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

चोपडा तालुक्याचे माजी आमदार दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील यांचे ९५ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले
दादासाहेबांचा जन्म १८ नोव्हेंबर१९२५ रोजी अंमळगाव ता.अमळनेर येथे शेतकरी कुटुंबात कै.श्री.गंभीर व कै. सौ.नर्मदा पाटील यांच्या पोटी झाला. दादासाहेबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चोपडा तालुक्यातील हातेड येथे झाले असून वैद्यकीय शिक्षण बडोदा, गुजरात येथे झाले आहे.दादासाहेबांनी चोपडा येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून आजवर वैद्यकीय सेवा केली.नामपूर ता.सटाणा जि.नाशिक येथील कै.श्री.धर्मराज जयदेवराव सावंत व कै.सौ.वासंतिकाताई सावंत यांच्या उच्च शिक्षित थोरल्या कन्या शरदचंद्रिका पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दादासाहेबांनी व तत्कालीन तालुक्यातील समविचारी शिक्षणप्रेमी मंडळी यांनी एकत्र येवून १९६९ मध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना करून कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय सुरु केले. कै.सौ.ना.अक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळा,चोपडा येथील वरिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील वनस्पतीशास्त्र विभागात मानद प्राध्यापक म्हणून सेवा दीली. कै.ना.सौ.अक्कासाहेब शरदचंद्रिका पाटील यांना १९८२ साली तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.परंतू ५ डिसेंबर १९८२ रोजी त्यांचे हृदयविकाराने दुर्दैवी निधन झाले.
१९८२ साली कै.ना.सौ.अक्कासाहेब शरदचंद्रिका पाटील यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी झालेल्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील विधान सभेवर निवडून गेलेत.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांनी सूतगिरणी सुरु करण्यासाठी प्रयत्न केलेत सूतगिरणी साठी भागभांडवल गोळा करून खाचणे शिवारात जमीन खरेदी केली. दादासाहेबांनी साखरकारखाना निर्मितीकामी आप्पासाहेब धोंडू उखाजी पाटील यांना सहकार्य केले.कै.ना.सौ.अक्कासाहेब शरदचंद्रिका पाटील मंत्री असतांना गुळ मध्यम प्रकल्प मंजूर करून घेतला.दादासाहेबांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत पदविका,पदवी व पदव्युत्तर औषध निर्माण महाविद्यालय,तंत्रनिकेतन पदविका विद्यालय,शिक्षण शास्र विद्यालय,नर्सिंग विद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण विद्यालय,महात्मा गांधी व कस्तुरबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,ऑक्सफर्ड इंग्लिश मेडियम स्कुल आदी शैक्षणिक विद्या शाखा सुरु केल्यात.तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कर्जाणे येथे वि.प्र. देशमुख पोस्ट बेसिक आश्रम प्राथमिक,माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय सुरु केलेत. तालुक्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी त्या अनुषंगाने प्रशिक्षित करण्यासाठी जन शिक्षण संस्थे ची स्थापना करून विविध प्रशिक्षण दालने सुरु करून जनशिक्षणाचे कार्य सुरू केले. दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील व कै.ना.सौ.अक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या संसार वेलीवर ५ फुलं उमललीत.त्यात शैलाताई,सुष्मा ताई, डॉ.शेखरभैय्या,अँड.संदीपभैय्या,शुभांगी ताई यांचा समावेश आहे. तिघही मुली उच्च शिक्षित असून गृहिणी आहेत तर मोठे सुपुत्र डॉ.शेखर पाटील मुंबई येथे वैद्यकीय सेवा देत असून अँड.संदीपभैय्या हे सरकारी वकील होते.दादासाहेबांचा वैद्यकीय वारसा त्यांचे सुपुत्र डॉ.शेखर सुरेश पाटील व त्यांच्या अर्धांगिनी डॉ.सौ.उषाताई शेखर पाटील तसेच अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या अर्धांगिनी डॉ.स्मिताताई संदीप पाटील चालवत आहेत.
दादासाहेबांचा व अक्कासाहेबांचा राजकीय व शैक्षणिक कार्याचा वारसा त्यांचे लहान सुपुत्र भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील हे चालवत आहेत अँड.पाटील यांनीचोपडा न.प.अध्यक्ष पद भूषवले असून, सध्या ते जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा-अध्यक्ष,जन शिक्षण संस्था,चोपडा-अध्यक्ष कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य आदी पदे समर्थपणे सांभाळत आहेत. तसेच अक्कासाहेबांच्या बंधूंच्या कन्या सौ.सुप्रियाताई सनेर या चोपडा न.प.च्या सध्या उपाध्यक्ष आहेत.

दादासाहेब आजीवन काँग्रेस पक्षाचे व गांधी विचारांचे पाईक राहिलेत.काँग्रेस पक्षाने अनेक चढ-उतार पाहिलेत पण दादासाहेबांनी काँग्रेस पक्षाची साथ शेवटपर्यंत सोडली नाही.दि.१८ नोव्हेंबर १२०१८ रोजी दादासाहेबांनी वयाची ९४ वर्ष पूर्ण करून ९५ व्या वर्षात पदार्पण केले आहे आणि आज दि.१ मे २०१९ रोजी आपल्याला सोडून गेले

सातपुडयाच्या पायथ्याशी दुर्गम अश्या भागात शिक्षणाची ज्ञान गंगा आणुन चोपडा तालुक्यातच नव्हें तर संपूर्ण महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातील विध्यार्थीना ज्ञान गंगा पोहचवली म्हणूनच दादासाहेब शैक्षणिक क्राती जनक ठरून शिक्षण महर्षि झाले दादांनी वैद्यकीय क्षेत्रात गोरगरिबांची सेवा केली दादांचे स्मितहास्यच अर्धे आजार बरे करत कोणत्याही पेशंट आला की स्मितहास्य करत त्याची विचारपूस करत व नाममात्र शुल्क आकारून कितीही दुर्धर आजारही बरा करत असत वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या नावलौकिकांमुळे ते आरोग्य दूत होते राजकारण करत असताना सुध्दा त्यांनी तालुक्यात एकोपाचे राजकारण केले त्याच्या राजकारनात समभाव होता त्यांच्या राजकारनाची शैली म्हणजे ८०% समाजकारण व २०% राजकारण होते दादांना त्यांच्या धर्मपत्नी कै.ना.सौ.अक्कासाहेब शरदचंद्रिका पाटील यांची ही मोलाची साथ लाभली जळगाव जिल्ह्याच्या कॉग्रेस कमिटीत दादासाहेबचा दबादबा होता त्यांनी आजन्म कॉग्रेस पक्षाची एकनिष्ठे ता होती म्हणूनच मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेच्या मंत्रिमंडळात कै.ना.सौ.अक्कासाहेब शरदचंद्रिका पाटील यांना मानाचे शिक्षण मंत्रिपद देण्यात आले
दादासाहेबना जैन समाजातील साधू संत बाबत विशेष लढा होता चातुर्मासात नियमित प्रवचन श्रवणासाठी सामायिकच्या वेषात वेळेवर उपस्थित राहत जैन शास्त्राचा अभ्यास सुद्धा त्यांनी केला तसेच जैन समाजातील नियम ते अंगीकारत असत तसेच ओम शांती परिवार बद्दलही त्यांना आस्था होती

Protected Content