चोपड्यात उद्या श्रींचे विसर्जन; पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

चोपडा प्रतिनिधी | शहरात पाचव्या दिवशी गणरायाचे विसर्जन होत असून यंदा ५० सार्वजनिक, ५ खाजगी गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असून सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदोबस्ताकामी ३० विविध दर्जाचे अधिकारी, ३०० पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड, आरपीएफ – १ कंपनी, एसआरपीएफ – २ प्लॅटून, दंगा नियंत्रण पथक – २ प्लाटून, स्ट्राईकींग फोर्स – २ प्लॅटून असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या जागा नेमून देण्यात आल्या आहेत. तसेच मिरवणुकीत डिजे आणि मोठ्या आवाजातील वाद्यांना परवानगी देण्यात आली नसून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे, संशयित वस्तू व इसम आढळून आल्यास पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आल

Protected Content