नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कन्याकुमारीतील नागरकोईलमधील माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. ए. मुरुगेशन (वय ५३) असे आरोपीचे नाव आहे.
कन्याकुमारीतील नागरकोईलमधील माजी आमदाराने एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके नेमण्यात आली होती. या पोलीस पथकांना अखेर यश आले आहे. ए. मुरुगेशन (वय ५३) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात त्याच्यासह इतर चार जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.