कॅटरिंग चालकाकांडून पोलिसांनी घेतली ५ हजारांची खंडणी; मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे तक्रार

जळगाव प्रतिनिधी। कॅटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या संचालकांकडून लोकडाऊनचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन तडजोडीअंती ५ हजारांची मागणी करणाऱ्या रामानंद नगरच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ५ हजार उकळल्याने सादर कॅटरिंग चालकाने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेकांकडे ऑनलाईन लेखी तक्रार केली असून या दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून देण्यात आली आहे.

तक्रारदार सचिन अनिल सोनार रा-७०६, विठ्ठलपेठ जुने जळगाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, तक्रारदार हे मोरया इव्हेंट्स या नावाने कॅटरिंगचा व्यवसाय करीत असून २५ जून २०२० रोजी क्रेझी होम हॉटेलमध्ये दोन वेगवेगळ्या मजल्यावर दोन विवास्थळांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची ऑर्डर सचिन सोनार यांना मिळाली. दोन्ही विवाहसोहळ्यांच्या आयोजनांबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला रीतसर परवानगी घेण्यात आली होती. परवानगी देण्याच्या वेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी विवाहसोहळा स्थळांची पाहणी करण्यात येईल, अशी सूचना दिली होती. कोव्हीड-१९ च्या प्राश्वभूमीवर प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, टेम्परेचर गन याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या तापमानाची नोंद करण्यात येत होती. तसेच विवाह सोहळा ठिकाणी गेटवर रजिस्टर नोंद करण्यात आली होती. ५० व्यक्तींच्या अधिक व्यक्तींना प्रवेश नव्हता त्याचे पालन करून विवाहात ५ फुटांचे अंतर ठेऊन पालनही करून त्याप्रमाणे खुर्च्या लावण्यात येऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. २५ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास रामानंद नगरचे कर्मचारी विशवनाथ गायकवाड आणि रवी पाटील या दोघांनी क्रेझी होम हॉटेलमध्ये येऊन दोघांनी तक्रारदार श्री. सोनार यांना बोलविले. श्री. सोनार यांनी ४९ लोक हजर असल्याचे कागदपत्रे दाखविले होते. दोन्ही वरील कर्मचाऱ्यांनी तक्रारदार आणि हॉटेल मालक चंद्रशेखर अग्रवाल यांना दोन्ही पोलिसांनी एकाच ठिकाणी दोन विवाह सोहळे आयोजित केल्याचे सांगत नियमांची पायमल्ली झाल्याचे सांगितले. मात्र तक्रारदार श्री सोनार आणि हॉटेल मालक यांनी आम्ही नियमांचे पालन करून रीतसर परवानगी घेतल्याचे सांगितल्यावरही दोघांनी काही एक न एकता हॉटेल सील करण्याची कारवाई करावी लागेल असे सांगून २५ हजार द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तडजोडीअंती ५ हजार द्यावे लागतील, अशी मागणी वरील दोन्ही कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी रामानंद नगरला डीबी रूमधील ड्रॉव्हरमध्ये पाच हजार टाकण्यास सांगितले. तसेच हॉटेलमालक आणि तक्रारदार यांचे पट्टे लिहून रवी पाटील यांनी सध्या कागदावर सह्या घेतल्या. तक्रारदार हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे समजल्यावर १ जुलै रोजी तक्रारदार श्री सोनार यांचा रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान नेरीनाका येथे अपघात झाल्याने ते यात गंभीर जखमी झाले. तसेच त्यांचा मित्र पावन बारी हे जखमी झाले. औषधोपचार झाल्यानंतर तक्रारदार यांनी रामानंद नगरच्या दोन्ही पोलिसांची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्र उपमहानिरीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी, रामानंद नगर पोलीस निरीक्षक आदींकडे तक्रार दिली आहे.

Protected Content