जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागातील महिलेला अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ तसेच फोटो पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी महिलेला एका अनोळखी व्यक्तीने १५ जुलै रोजी अश्लील फोटो , अश्लिल व्हिडीओ तसेच व्हॉईज मेसेसेज व रेकॉर्डींग पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत महिलेचा फोटो शेअर करुन महिलेची बदनामी व्हावी असे कृत्य केलं. याप्रकरणी महिलेचे शनिवार, २३ जुलै रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुध्द विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या मोबाईलवर पाठविले अश्लिल फोटो अन् व्हिडीओ
3 years ago
No Comments