जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा भागात राहणाऱ्या दोन तरूणाचे एका धुणंभांडी करणाऱ्या महिलेवर प्रेमाचे सुत जुळले होते. मात्र त्या दोघा प्रियकरांमध्ये वाद उफाळून आल्याने हाणामारी होवून एका प्रियकराने दुसऱ्या प्रियकराचा खून केल्याची दुदैवी घटना मेहरूण स्मशानभूमीजवळ घडली. दरम्यान, जखमीवस्थेत तरूणास रूग्णालयात नेत असतांना मृत्यू ओढवला. या घटनेमुळे तांबापुरा व मेहरूण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, अंकुश उर्फ बबलु नाना हटकर (वय-३५) रा. रामबाबा कुटीया, तांबापुरा हा आई व पत्नी सोबत राहतो. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. बबलु ज्या ठिकाणी काम करतो त्याठिकाणी धुणं भांडी धुण्याचे काम करणारी महिलेशी प्रेमसंबध होते. त्याच महिलेशी सुभाष निंबा मिस्तरी याचेही प्रेमसंबध होते. सुभाष निंबा मिस्तरी हा चार वर्षांपुर्वी रामबाबा कुटीया येथे राहत होता आता मेहरूण येथे राहतो.
हेही वाचा : जळगावात तरूणाचा गुप्तीने वार करून खून
३ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बबलु, त्याची आई अरूणाबाई हटकर घरात असतांना तांबापुरा भागात राहणारा अजिज हमीद तडवी हा घरी येवून बबलुला मोटारसायकलवर क्रमांक (एमएच १९ बी ६७३३) वर घेवून डीमार्टकडे घेवून गेला. त्यावेळी सुभाष मिस्तरी हा देखील सोबत होता. मेहरूण मधील स्मशानभुमीजवळ दोघांमध्ये प्रेमसंबंधातून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, नंतर सुभाषने धारदार गुप्तीने बबलुच्या हातावर, छातीवर करून गंभीर जखमी केले. यावेळी अजिज तडवी त्याठिकाणी उपस्थित होता. दोघांमधील वाद व भांडण सोडवून अजिजने जखमी बबलुला दुचाकीवर बसून एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेवून जात असतांना हॉटेल कस्तूरीजवळ बबलु बेशुध्द झाला. त्यानंतर अजिज तडवीने रिक्षाने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी बबलु मयत झाल्याचे घोषीत केले. दरम्यान रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अजिज तडवी बबलुच्या घरी आला. सुभाष आणि बबलुच्या प्रेमसंबंधातून वाद होवून धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले. अरूणाबाई हटकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात सुभाष मिस्तरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीस एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा : अरे देवा….जळगावातून ८० संशयितांचे स्वॅब सँपलच गायब !
सदर घटनेबाबत माहिती मिळताच लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नीलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनला सूचना दिल्यात. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, अशोक सगत, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, निलेश पाटील, नितीन पाटील, आसीम तडवी, सचिन पाटील, संदीप पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, भूषण सोनार अशांनी मयताची ओळख पटवून आरोपीची माहितीकडून आरोपी आज रात्री ताब्यात घेतले होते. चौकशीअंती त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे, रतिलाल पवार करीत आहे.