महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते जळगाव रेल्वे स्थानक दरम्यान अज्ञात चोरट्यांनी महिलेजवळील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगिता जगदीश काकडे (वय-३२, रा. अशोक सम्राट नगर, जामनेर) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २४ जून रोजी सकाळी ११ वाजता त्या कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आल्या होत्या. त्यावेळी त्या शहरातील आकाशवाणी चौकातून रिक्षामध्ये बसल्या त्यानंतर जळगाव रेल्वे स्थानक येथे उतरल्या. या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने व २५ हजारांची रोकड असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना घडल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार सोमवारी २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने संदर्भात पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.

 

Protected Content