महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरूणाला सुनावली सहा महिन्याची शिक्षा

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरूणाला जळगाव जिल्हा न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा आणि ३ हजाराचा दंड अशी शिक्षा बुधवारी २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील राहणारा विलास जुलाल भिल (वय-२५) याने २१ मे २०१४ रोजी विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून विलास भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अहिरे हे करीत होते. प्रकरणी २ डिसेंबर रोजी न्यायमुर्ती पी.आर. वागडोळे यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र जळगाव जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकुण १० साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीत महिला, तिचे पती, गावातील व्यक्ती आणि तपासाधिकारी सहाय्यक निरीक्षक अशोक अहिरे यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षी व पुराव्याअंती न्यायालयाने विलास जुलाल भिल याला दोष ठरवत ६ महिन्याची शिक्षा आणि ३ हजार रूपयांची दंड अशी शिक्षा बुधवारी २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सुनावली आहे. यासाठी पैरवी अधिकारी पो.कॉ. भगवान आरेख आणि विलास पाटील यांनी काम पाहिले.

Protected Content