महिलेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) । नाशिक येथील सासर असलेले आणि जळगावची माहेरवाशिणीचं छळ केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे लग्नाच्या रात्री बळजबरी हुक्का आणि बियर पाजण्यास पतीने प्रवृत्त केल्याचेही महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत सांगितले की, विवाह जुळल्यापासून सासरच्या मंडळीकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. पारावर मानाचे ताटच्या ऐवजी १० हजाराची मागणी करण्यात आली. तसेच लग्नात मेकअपसाठी लागलेले २५ हजार रुपये देखील माहेरून आणण्यासाठी छळ करण्यात आला. लग्नानंतर हनिमूनसाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर गेल्यावर पतीने बिअर पिण्यासाठी जबरदस्ती केली. एवढेच नव्हे तर बळजबरीने हुक्का पिण्यास भाग पाडले. यासंदर्भात पती भूषण दिनकर मोरे (वय ३४), सासू कमल दिनकर मोरे, सासरा दिनकर भास्कर मोरे आणि नणंद वृषाली जयेश कोरे सर्व रा. सिद्धार्थ नगर, लोंढे गेस्ट हाऊस मागे, नाशिक यांचेविरुद्ध भादवी कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content