महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्य विषयक व्याख्यान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे महिलांना त्यांच्या मासिक पाळी आणि आरोग्याविषयी जागृत करण्याच्या उद्देशाने जाहीर व्याख्यान या जनजागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. झि तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना. भा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय धानोरा, ता. चोपडा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांचे ‘ मासिक पाळी व महिलांच्या आरोग्यासाठी योग साधना ‘ या विषयावरील जाहीर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी विविध योगिक प्रक्रिया आणि सकारात्मक मानसिक आरोग्याचा मासिक पाळीच्या विविध समस्यांतून बाहेर पडण्यासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर निसर्गोपचार तज्ञ प्रा. सोनल महाजन यांनी मासिका पाळी विषयीचे समज – गैरसमज आणि त्यासंबधीत विकारावर नैसर्गिक कोणकोणते उपचार करता येवू शकतात, पाळीच्या दिवसात स्वत:ची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन करून उपस्थित महिलांच्या प्रश्नांचे समाधानही केले.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप विष्णु महाजन, प्रमुख जगदीश पाटील, व्याख्याते डॉ. देवानंद सोनार संचालक, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, प्रा. सोनल महाजन नॅचरोपॅथी समन्वयक, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास महाजन यांनी, सूत्र संचालन रेखा महाजन यांनी तर आभार पूनम पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास महाजन , पर्यवेक्षक नवल महाजन , मुख्याध्यापक जमादार , कृष्णाली पाटील, राहुल खरात आणि सर्व शिक्षिका शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेतले. अंदाजे २१७ महिला व विद्यार्थिनिंनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला, अशाप्रकारच्या कार्यक्रमांची खेडे गावातील महिलांसाठी नितांत आवश्यकता असून ती गरज मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे पूर्ण केली जात असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

Protected Content