महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी महावीर ज्वेलर्सतर्फे पिंक ऑटोसाठी सहकार्य

जळगाव, प्रतिनिधी | समाजाचे आपण नेहमी देणे लागत असतो व महिला सबलीकरणाची उदात्त भावना आपल्या उराशी बाळगून महावीर ज्वेलर्सने नेहमी सहकार्य करीत आले आहे. महावीर ज्वेलर्स’कडून डाऊनपेमेंट, मराठी प्रतिष्ठान व खुशाल ऑटोमोबाईलतर्फे ट्रेनिंग व पास, युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या कडून कर्ज या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू रणरागिनींना अतुल पिंक ऑटोचे वितरण करण्यात आले.

समाजामध्ये आपण काही चांगले करण्याची जिद्द, आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे ही चिकाटी मनाशी बाळगून या महिलांनी धाडसी पाऊस उचलले. परंतु, ऑटोरिक्षा घेण्यासाठी किंवा बँकेतून कर्ज घ्यावे तर बँकेला देण्यासाठी डाऊनपेमेंटची व्यवस्था या महिलांकडे नव्हती. मराठी प्रतिष्ठान, महावीर ज्वेलर्स व युनियन बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने महावीर ज्वेलर्सने पाच ऑटो रिक्षांचे एकूण एक लाख रूपयाचे डाऊनपेमेंट बँकेत मदत स्वरूपात जमा करून सहकार्य केले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत समाजाला व रणरागिंनींना फायदा व्हावा याच भावनेतून या सर्व महिलांना वाहन चालविण्यासाठी ई-पाससुध्दा काढून देण्यात आला आहे. आपल्या भावना व्यक्त करतांना महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी यांनी आश्वस्त केले की यापुढे ही कोणालाही मदत लागत असेल तर आम्ही सदैव आपल्याला सहकार्य करू. या होतकरू रणरागिणींना डाऊनपेमेंटच नव्हे तर समाजाचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम होतो. याचा आढावा आम्ही सातत्याने घेत राहून या आमच्या माता-भगिनींना कुठेही त्रास होणार नाही याची सुध्दा काळजी आम्ही घेणार आहोत. या कार्यक्रमाला महावीर ज्वेलर्स संचालक अजय ललवाणी, कुणाल ललवाणी, मुकेश ललवाणी, राजेश ललवाणी, निलेश ललवाणी, भवरलाल लुणिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्याधर नेमाने व कार्यक्रमाचे आभार मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे यांनी मानले.

पिंक ऑटोबाबतच्या ठळक घडामोडी

पिंक ऑटो- मुंबई,ठाणे येथे महिला रिक्षा चालक मालक आहेत त्याच प्रकारे जळगांव शहरात पिंक ऑटो सुरू व्हावी म्हणून मराठी प्रतिष्ठाण प्रयत्नशील होते. उपप्रदेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे महिलांना ट्रेंनिग, लायसन्स, बिल्ला,परमीट ही प्रक्रिया करता आली त्याकरिता परिवहन कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. ऑटो ट्रेंनिग- खुशल ऑटोमोबाईल चे संचालक विद्याधर नेमाने यांनी विनामूल्य ट्रेनिंग देण्याकरिता त्यांचे शोरूम मधील अनुभवी नूरभाई यांना प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिली.नूरभाई यांनी उत्तम प्रशिक्षण दिले, डॉ. विद्या चौधरी व श्री चौधरी यांच्यातर्फे रिक्षा चालक भगिनी यांना प्रत्येकी 2, गुलाबी रंगाचे ऍप्रन देण्यात आले. भरारी महिला बचत गटच्या संचालिका संजीवनी यांच्यातर्फे कापडी मास्क देण्यात आले. शहरातील व जिल्ह्यातील गरजू महिलांनी पिंक ऑटो या रिक्षा व्यवसायात यावे. १ जून २०२० पासून पुन्हा नाव नोंदणी मराठी प्रतिष्ठान,गणपती नगर येथे सुरू होणार आहे. मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष विजय वाणी, सचिव सतीश रावेरकर,महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा रावेरकर, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, डॉ विद्या चौधरी, या सर्वांनी हा उपक्रम पूर्ण करून जळगांव शहरात नवीन संकल्पना आणली..

Protected Content