मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीत कोणताही वाद सुरू असण्याचा प्रश्नच नाही. आमच्यामध्ये वाद व्हावेत म्हणून काही लोक वाट बघत आहेत. ते अशा प्रकारचा प्रचार करण्याचं काम करत आहे. पण, हा प्रसार सोडला तर कसलाही वाद नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे आणि आम्ही सर्व एकत्र आहोत, असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी कोणताही वाद नसल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीत कोणताही वाद सुरू असण्याचा प्रश्नच नाही. आमच्यामध्ये वाद व्हावेत म्हणून काही लोक वाट बघत आहेत. ते अशा प्रकारचा प्रचार करण्याचे काम करत आहे. पण, हा प्रसार सोडला तर कसलाही वाद नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे आणि आम्ही सर्व एकत्र आहोत, असे थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले. राष्ट्रवादीने नगरसेवक फोडल्याने शिवसेना नाराज असल्याचेही वृत्त समोर आले होते. मात्र, यावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचे वृत्त राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फेटाळून लावले आहे.