महाविकास आघाडीच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा : आ. राम कदम

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील मोठे प्रकल्प बाहेर जाण्याच्या प्रकरणी मविआच्या नेत्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

भाजपा नेते राम कदमयांनी एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणार्‍या विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील असंही म्हटलं आहे. राम कदम यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

या ट्विटमध्ये राम कदम यांनी नमूद केले आहे की, एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणार्‍या प्रमुख सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा. वेदांता फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा फायनल करून सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले? असा प्रश्‍न यात विचारण्यात आले आहे. यात पुढे म्हटले आहे की, त्यांच्याकडून कोणी आणि किती टक्केवारी, कमिशन मागितले? कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग झाली? मीटिंगला कोण कोण उपस्थित होते? वेदांताने जागा फायनल करून सुद्धा त्यांच्यासोबत चजण का केला नाही? कंपनीच्या प्रमुख लोकांना भेटण्यास टाळाटाळ का? आणि कोणाच्या सांगण्यावरून केली? नेमक हेच कारण एअरबसच्या बाबतीत सुद्धा आहे का? नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Protected Content