महाराष्ट्र सरकार अपयशी, राज्यात राज्यात तातडीने लष्कर पाचारण करा : नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्यसरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यात तातडीने लष्कर पाचारण करून करोनाचा प्रादुर्भाव रोखावा, अशी मागणी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी केली. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा ३ हजाराच्या वर गेला आहे, रुग्ण वाढ आणि मृत्यूला हे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे.

 

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलतांना राणे म्हणाले की, ज्यातील करोना रुग्णांची संख्या ३ हजाराच्यावर गेली आहे. मृतांचा आकडाही वाढत आहे. इतर राज्यांनी जशी काळजी घेतली तशी काळजी घेण्यात आलेली नाही. करोनाबाधितांवर हवे तसे उपचार झालेले नाहीत. ज्या ठिकाणी करोना रुग्ण सापडले त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. केवळ आकडेवारी जाहीर केल्याने काम होत नाही. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं सांगतानाच लोक लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करत नाहीत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात लष्कर आणि होमगार्डला पाचारण करावे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. मजुरांची गर्दी का होते? वांद्र्यात जमावबंदी नाही का? पोलिसांनी गर्दी जमू कशी दिली? सरकारचं हे अपयश आहे, सरकारमध्ये ताळमेळ नाही, सोशल मीडियावर सरकारचं कौतुक करायला लावले जात आहे , असा आरोप नारायण राणे यांनी केला.

Protected Content