महाराष्ट्र वाणी युवा मंचची नूतन कार्यकारिणी जाहीर

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा ची नुकतीच नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून महेंद्र वसंत महालपुरे यांची अध्यक्षपदी, योगेश रमेश शेंडे यांची उपाध्यक्षपदी, विजय जगन्नाथ सोनजे यांची खजिनदारपदी, अशोक काशिनाथ बागड यांची कार्याध्यक्ष पदी, शरद बाळकृष्ण पाटे यांची तालुकाध्यक्षपदी, प्रकाश मधुकर येवले यांची ज्येष्ठ संघटकपदी, प्रा. राजेंद्र जनार्दन चिंचोले यांची ज्येष्ठ सल्लागारपदी निवड करण्यात आली.

ज्येष्ठ मार्गदर्शकपदी प्रा. लक्ष्मण हरी सिनकर, किरण गोपाळ अमृतकर, संजय पुंजू शेंडे तसेच प्रविण एकनाथ शेंडे यांची निवड करण्यात आली.

सदर कार्यकारिणीत संदीप बबन महालपुरे, विशाल बाळकृष्ण ब्राम्हणकर, गणेश प्रकाश सिनकर, विवेक बापूराव ब्राम्हणकर यांची सदस्य या पदावर निवड करण्यात आली असूनरमेश रामदास महालपुरे यांची प्रसिद्धी प्रमुख या पदावर निवड करण्यात आली.

सदर कार्यकारिणी निवड महाराष्ट्र वाणी युवा मंचचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर रघुनाथ कोतकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Protected Content