महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी फईम शेख

*पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील फईम शेख यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते फहिम शेख यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. फहिम शेख यांनी विविध पक्षात काम केले असून त्यांचा परिचय आज सर्व पाचोरा तालुक्यात असून अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कामाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी घेतली असून त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड हे प्रदेश उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख विनय भोईटे व जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ व नरेश पाटील यांनी केली आहे. त्यांच्या निवडीबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Protected Content