महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत दोघे जखमी

Accident

जळगाव प्रतिनिधी । महामार्गावर दुचाकीस्वार तरुणांना भरधाव वाहनाने धडक दिली. यात एका तरुणाचा डावा पाय गुडघ्यापासून मोडला. तर दुसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता नशिराबादजवळ महामार्गावर हा अपघात झाला.

याबाबत माहिती अशी की, यशवंत रामा सपकाळे (वय २४, रा.कडगाव, ता.जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या मित्रास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यशवंत हा मित्रासह नशिराबाद येऊन कडगावला जात असताना रस्त्यावर समोरुन येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात यशवंतचा डावा पाय अक्षरश: मोडला गेला. अपघातानंतर दोघे जण जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होते. काही वाहनचालकांनी त्यांना उचलून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. यशवंत याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना धडक देणारा वाहनचालक पळुन गेला आहे.

Protected Content