महामानव डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिराचे शुभारंभ करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिराप्रसंगी नेत्रतज्ञ डॉ. स्वप्नील कोठारी,दंत तज्ञ डॉ. अनुजा पाटील. व अॅड.प्रतिभा पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. जळगाव शहर महानगर कार्याअध्यक्ष योगेश हिवरकर. यांनी मानवाच्या अन्न वस्त्र निवारा या जश्या मूलभूत गरजा मानल्या जातात त्याचा प्रमाणे प्रत्येक मानवाचे आरोग्य देखील हे खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य उत्तम तर मानव जीवन सुखी असे मनोगतात व्यक्त करण्यात आले. या शिबीरप्रसंगी आशा गट प्रवर्तक शारदा लुटे, बबिता बाविस्कर, छाया बिरारी, योगिता कोळी, प्रतिभा काळे, मृणाल पाटील, वैशाली.बारी, जोष्णा शिंदे, तसेच आरोग्य अधिकारी समवेत गणेश राणे, समाधान चौधरी, गोपाळ माळी यांनी रुग्णाची तपासणी केली. यावेळी जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर, जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई, जळगाव शहरमहानगर कार्याध्यक्ष अनिल वाघ सर, जळगाव महानगर सचिव चंदन पाटील, सदस्य हेमंत सोनवणे, पवन खबायत, हेमराज सोनवणे, भुपेद्र ठाकरे, विक्रम कापडणे, दुर्गेश निंबाळकर, तुषार तायडे याच्या समवेत आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरांत शेकडो रिक्षा चालक मालकांनी आरोग्य तपासणी करून घेतले. यशस्वीतेसाठी आप पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. हेमंत सोनवणेनी आभार मानले.

Protected Content