जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न, महामानव, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिम सैनिक,सामाजिक व राजकीय संघटनातर्फे रेल्वे स्टेशन येथे आदरांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळपासूनच अभिवादन करण्यात येत आहे. यात विविध सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी तसेच भीम सैनिकांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, दिलीप सपकाळे, रमेश सोनवणे, अमोल कोल्हे, महेंद्र केदारे, हरीश्चंद्र सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, वाल्मिक सपकाळे, बहुजन क्रांती मोर्चा राज्य संयोजक सुमित्र आहिरे, अमृता नेतकर, अजित भालेराव, पंकज सोनवणे,खुशाल सोनवणे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला आघाडी महानगराध्यक्ष दीप्ती चिरमाडे आदींनी अभिवादन केले.