महात्मा फुले जन आरोग्य संकुलात शंभर खाटांच्या प्रस्तावास मंजुरी मिळेल – खा उन्मेश पाटील

 

 

चाळीसगाव : प्रतिनिधी ।  येथील  महात्मा फुले जन आरोग्य  संकुल या तीस खाटांच्या उप जिल्हा रुग्णालयास लवकरच शंभर खाटांची मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश  पाटील यांनी केले

 

. आज किसनराव जोर्वेकर वाढदिवस समितीच्या वतीने  महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा केअर सेंटरला ३० ऑक्सिजन फ्लो मीटर भेट देण्यात आले. याप्रसंगी खा उन्मेश पाटील बोलत होते.

 

खासदार उन्मेश  पाटील पुढे म्हणाले की , आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांनी , सामाजिक कार्यकर्त्यांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून सेवेची संधी दिली  यातूनच ट्रामा केअर सेंटर सारखी  वास्तू उभी राहिली. हे जन आरोग्य संकुल कोरोना महामारीत हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करत आहे. सातत्याने रुग्ण संख्या वाढत असताना सामाजिक जाणिवेतून पत्रकार किसनराव जोर्वेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या आरोग्य संकुलात मदतीची घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. अनेक वर्षे विविध भूमिकेतून जेष्ठ पत्रकार जोर्वेकरमामांनी आपली संघर्षशिल वाटचाल सुरू ठेवली. याच भावनेतून वाढदिवस कृती समितीने तालुक्‍यातील ज्या ज्या ठिकाणी समाजाला उत्तरदायित्व देण्याची गरज असेल त्या त्या ठिकाणी जागल्याची भूमिका घ्यावी असेही ते म्हणाले .

 

सुरुवातीला कलंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ सुनील राजपूत यांनी प्रास्ताविकातून  समितीने राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. मंदार करंबेळकर यांनी मनोगत व्यक्त केले. समितीचे अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी जोर्वेकर यांच्या  जीवन चरित्रास उजाळा देत अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची त्यांची शिकवण आम्ही आज आचरणात आणली आहे. अशी भावना व्यक्त केली. सूत्रसंचलन नगरसेवक तथा स्मरणिका समिति प्रमूख रामचंद्र जाधव तर आभार सचिव अरुण पाटील यांनी मानले. कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील, शिवसेनेचे भिमराव खलाणे,  मार्केट कमिटीचे प्रशासक दिनेश पाटील, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, कवी गौतम निकम, सामजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोरपडे, अल्पसंख्याक नेते अल्लाउद्दीन शेख, पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चौधरी, आदर्श शिक्षक बापुराव पवार, मिलिंद शेलार,  दीपक पाटील,  नगरसेवक रोशन जाधव, राकेश नेवे,  मुकेश नेतकर, स्वप्निल जाधव, संजीव पाटील, नगरसेवक सूर्यकांत ठाकूर, प्रकाश पिंगळे, दिलीप पवार, तुषार दुसे, यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रकाका जैन , अमित सुराणा, किशोर रणधीर, कोरोना समुपदेशक रणजित गव्हाळे, राहुल पवार यांच्यासह कार्यकर्ते   उपस्थित होते.

यावेळी सत्कारमूर्ती किसनराव जोर्वेकर यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की मी माझ्या आयुष्यात सतत संघर्ष करत आलो आहे माझा संघर्ष सत्याच्या बाजूने आणि प्रामाणिक नागरिकाच्या बाजूने असल्याने मला मरणाची भीती नाही अनेकांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला पण मी आजही जसा होतो तसाच आहे. संघर्ष हे माझे जिवन आहे. अशाच संघर्षातून उन्मेश  पाटील यांनी आमदारकी मिळवली त्यांच्या संघर्षात मी देखील अनेकदा सहभागी होतो.अनेक आमदार या तालुक्याने बघितले मात्र उन्मेशदादा यांच्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात तालुक्यात विकासाची गंगा उभी राहिली. आज हे महात्मा फुले जन आरोग्य संकुल पाहून  प्रत्येकाची अभिमानाने छाती भरुन येत असल्याचे आणि खासदार उन्मेशदादा यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना निर्माण होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी ज्येष्ठ पत्रकार किसन जोर्वेकर यांनी व्यक्त केले.

Protected Content