डॉ.उल्हास पाटील हॉस्पीटलमध्ये तोडफोड करून दोन कर्मचाऱ्यांना मारहाण; तीन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळगाव खुर्द परिसरातील डॉ. उल्हास पाटील मेडीकल महाविद्यालय आणि हॉस्पीटलमध्ये रूग्णाचा मृत्यू झाल्याचे वाईट वाटून मयताच्या नातेवाईकांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून क्लर्कसह एकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास बोदवड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णाला नातेवाईकांनी डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यासाठी आणले होते. यातच रूग्णाचा मृत्यू झाला. हॉस्पीटलच्या दिरंगाईमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्याचे समजून मयत रूग्णाच्या सोबत आलेले अजय दिलीप निकम (वय-२५), गणेश मधुकर वाघ (वय-२४) आणि विनोद वेडू इंगळे (वय-२७) रा. सुनोटी ता. बोदवड या तीन तरूणांनी हॉस्पिटलच्या कार्यालयात येवून क्लर्क निखील अरूण चौधरी (वय-३०) यांच्यासह एकाल जाबविचारत तिघांनी बेदम मारहाण केली. तर कार्यालयातील खुर्च्या अस्तव्यस्त करत सामानांची तोडफोड केली . याप्रकरणी डॉ. उल्हास पाटील मेडीकल महाविद्यालयाचे क्लर्क निखील चौधरी यांच्या फिर्यादीवरून तिघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण करीत आहे. 

 

Protected Content