महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यात यावा अन्यथा आमरण उपोषण

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नियोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा पुतळा त्वरित बसविण्यात यावा अन्यथा  राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चातर्फे उद्या सोमवार दि. २० जूनपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

गेल्या २५ ते ३० वर्षापासून पाचोरा नगरपालिकेमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसवण्याचा ठराव मंजूर आहे. परंतु प्रत्यक्षात नियोजित जागेवर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा अजून पर्यंत बसविण्यात आलेला नाही. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व नियोजित जागेवर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील आनंदराव शिंदे, माजी नगरसेवक अशोक शंकर मोरे, वासुदेव भिवसन माळी, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे हे दि. २० जून रोजी सकाळी १० वाजेपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे, याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाने त्वरित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा नियोजित जागेवर बसवावा अशी उपोषणकर्त्यांतर्फे मागणी करण्यात येत आहे. या उपोषणास समता सैनिक दल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शाखा, पाचोरा, मराठा सेवा संघ (पाचोरा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पाचोरा), संभाजी ब्रिगेड (पाचोरा), युवक काँग्रेस (पाचोरा), शिवस्वराज्य युवा फाउंडेशन (पाचोरा) सह पाचोरा शहरातील पुरोगामी संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच उपोषणास अॅड. अविनाश भालेराव, अॅड. अण्णासाहेब भोईटे, अॅड. अनिल पाटील, अॅड. रणजीत तडवी, मा. नगरसेवक बशीर बागवान, विलास पाटील, खलील देशमुख, भरत खंडेलवाल, नंदकुमार सोनार, मच्छिंद्र जाधव, धनराज मेघराज पाटील, मतीन बागवान यांनी समर्थन केले आहे.

Protected Content