महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी बुलेट ट्रेन प्रकल्प का स्थगित केला नाही  : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही? असा प्रश्न काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, कोट्यावधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यकरण परियोजना यांसारख्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी करोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करणे हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे.

Protected Content