जळगाव, प्रतिनिधी | येथे महर्षी श्रृँग ऋषी बहुउद्देशीय संस्था व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
लसीकण शिबिराचे आयोजन १५ ते १८ वयोगटातील मुला, मुलींसाठी करण्यात आले होते. या शिबिरास नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लसीकरणप्रसंगी विश्वनाथ जोशी, राधेश्याम व्यास, राजेंद्र जोशी, मीना पांडे, भारती ओझा, मीरा जोशी, हर्षा नागला, प्रीया नागला यांची उपस्थीती होती. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोशी, उपाध्यश रवी पांडे, प्रेम जोशी, सुशील पंडीत, जितेंद्र जोशी, मनोज पांडे, मोहित जोशी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन भागवत भवन शनीपेठ येथे घेण्यात आले होते.