शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेटसमोरून एका तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. याप्रकरणी शनिवारी २० जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख जुनैद शेख मोहम्मद काकर वय २९ रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शेख जुनैद हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीबी ६९९७) ने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आलेले होते. त्यावेळी दुचाकी महाविद्यालयाच्या गेट समोर पार्कींग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली, हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी २१ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा पाटील हे करीत आहे.

Protected Content