मल्लिकार्जुन खरगे होणार राज्यसभेचे विरोधी पक्षनेते

 

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था ।  राज्यसभेमध्ये विरोध पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काॅंग्रेसचे  ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे  यांच्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते म्हणून सभापतींकडे काॅंग्रेसकडून पाठवण्यात आली आहे.

काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

 

त्यांनी सांगितले की, काँग्रेसने  राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना नव्या विरोधीपक्षनेत्याबाबतची माहिती दिली आहे. आझाद हे कार्यमुक्त झाल्यानंतर आता मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी नामांकित करण्यात आले आहे.  खर्गे यांना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाते. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. खर्गे यांनी यापूर्वी लोकसभेमध्येही पक्षाचे नेते म्हणून काम पाहिले होते.

Protected Content