कोलकाता : वृत्तसंस्था । मला हिंदू धर्म शिकवत आहेत. मी हिंदू ब्राम्हणाची मुलगी आहे. तुमच्यापेक्षा जास्त हिंदू धर्म जाणते. माझ्यासाठी सर्व समान आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक समान आहेत, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधलाय
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनपेक्षितपणे हिंदू कार्ड खेळायला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी अनेक हिंदू मंदिरांमध्ये दर्शन घेतलं. आता दुसऱ्या टप्प्यातही त्यांनी हिंदू कार्ड बाहेर काढलं आहे. .
“मी लोकांमध्ये भेदभाव करणार नाही. मला आई-वडिलांनी भेदभाव करायला शिकवलं नाही. माझ्या घरात ज्या बाउरी महिला काम करत आहेत. चार महिला काम करतात. सर्वांना नोकरी दिली आहे.” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्याचबरोबर ममता यांनी भाजपचा डाकू असा उल्लेख केलाय. “ते सगळ्यांना चोर म्हणत आहेत. स्वत: ते डाकुंचे सरदार आहेत. भाजप काय करतेय? नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? सर्व काही विक्री काढत आहेत आणि आता बंगालचा सोनार बांग्ला करण्याच्या बाता मारत आहेत. सोनार बांग्लाही बोलू शकत नाहीत. सोनार बांग्लाला शोनार बांग्ला म्हणत आहेत. रविंद्रनाथ टागोर यांची जन्मभूमी जोडासांकू सांगतात. विद्यासागर यांची मूर्ती तोडतात. गुजरातमधील दंगलीचे नायक आहेत. दंगा करतील तर माझ्यात पंगा घेण्याची ताकद आहे”, अशा शब्दात ममता यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांनाच आव्हान दिलं आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार काल थंडावला आहे. शनिवारी 5 जिल्ह्यातील 30 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यातील बाकुंडा जिल्ह्यातील, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 6, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 7, झाडग्राम जिल्ह्यातील 4 तर पुरुलिया जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.यातील सर्व बूथ संवेदनशील आहे. संवेदनशील बूथवर केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात असणार आहेत. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात पश्चिम बंगाल पोलीस असणार नाहीत. याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. पण निवडणूक आयोगाने तो फेटाळून लावला.