मला आशा कोरोना आपोआप नाहीसा होईल : डोनाल्ड ट्रम्प

वाशिंग्टन (वृत्तसंस्था) मला आशा आहे की कोरोना आपोआप नाहीसा होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय याची कल्पना आहे तरीही मला आशा आहे की कोरोना गायब होईल. एवढेच नाही तर लवकरच कोरोनावर आम्ही लस शोधून काढू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी फॉक्स न्यूजला एक मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, सध्या आम्ही कोरोना काळ असूनही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहोत. त्यामुळे लवकरच अमेरिका सुस्थितीत असेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. बुधवारी अमेरिकेत कोरोनाचे नवे ५२ हजार रुग्ण आढळले आहेत. ज्यानंतर अमेरिकेतली करोना रुग्णांची संख्या २८ लाख झाली आहे. अमेरिकेत करोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

Protected Content