मुंबई वृत्तसंस्था । लॉकडाऊनच्या काळात मित्रांसोबत कारने फेरुटका मारत असतांना मरीन ड्राईव्हवर भागात उभ्या असेलल्या बसवर भरधाव कार धडकून झालेल्या भीषण अपघातात एका बड्या उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू झाला. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी भरधाव आणि निष्काळजीपणाने वाहन चालवणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कारचालक तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी संध्याकाळी कार चौपाटीकडे जात असताना मरीन ड्राईव्ह उड्डाणपुलापासून सुमारे १०० मीटर अंतरावर हा अपघात झाला. कारमध्ये तिघे जण असल्याची माहिती आहे. तिसरा मित्र वेदांत पाटोदियासुद्धा जखमी आहे
अपघातात मृत्युमुखी पडलेला १८ वर्षीय आर्यमान नागपाल हा नेपियन्सी रोड भागातील रहिवासी होता, तर कार चालवणारा त्याचा १९ वर्षीय मित्र शौर्यसिंग जैन हा कफ परेडला राहतो. त्याला हरकिशन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कार शौर्यसिंग जैनच्या मामाची होती. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी भरधाव आणि निष्काळजीपणाने वाहन चालवणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सीसीटीव्ही फूटेज शोधून अधिक तपास करत आहेत.