माझ्यापेक्षा पत्नीला जास्त पगार- देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी । माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे. त्यामुळे तो माझ्या लक्षात राहतो असे मिश्कील प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते अर्थसंकल्प सोप्या भाषेत या त्यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेल्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे बुधवारी मान्यवरांच्या उपस्थिती प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले की, आपल्याला मिळणारा पगार, पत्नीला मिळणारा पगार ही आपली आवक आहे. तर घरचा खर्च जावक आहे. त्याच्याकरिता जे काही वित्तीय व्यवस्थापन आपण करतो आणि तसंच राज्याचं वित्तीय व्यवस्थापन असतं. यामध्ये जास्त फरक नाही. फक्त राज्यात अधिक व्यापकता असते. राज्याला जास्त मोठं काम करावं लागतं. आपण बजेट नीट समजून घेतलं तर भीती निघून जाईल, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे म्हणून मला तो लक्षात राहतो असे ते गमतीशीरपणे म्हणाले. आपले पुस्तक सामान्य माणसाला बजेटमधील प्रत्येक गोष्ट सहजपणे कळली पाहिजे यासाठी हे आहे. आपण असं पुस्तक लिहिलं पाहिजे जे जास्तीत जास्त ४४ मिनिटात वाचता आलं पाहिजे अशी अट मीच ठेवली होती, अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

Protected Content