मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी : अशोक चव्हाण

मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. पण विधीमंडळाने सर्व सहमतीने पारित केलेले मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले आहेत. मराठा आरक्षण उपसमितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत अशोक चव्हाण बोलत होते.

 

 

शुक्रवारी सायंकाळी संध्याकाळी मराठा आरक्षण उपसमितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. यावेळी अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेतले. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. पण विधीमंडळाने सर्व सहमतीने पारित केलेले मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी आहे, असेदेखील चव्हाण यावेळी म्हणाले. या बैठकीत खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार विनायक मेटे यांच्यासह आणखी काही अभ्यासकांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीला समितीचे सदस्य मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, शासनाचे संबंधित अधिकारी आणि वकील उपस्थित होते.

Protected Content