यावल : प्रतिनिधी । विकास युवा प्रतिष्ठान अँण्ड एज्युकेशन सोसायटी संचलित इंजिनिअरिंग कृती समितीच्या यावल तालुका अध्यक्षपदी मयूर सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
हिंगोणा येथील रहिवाशी असलेले मयूर सोनावणे यांनी जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय,(फैजपुर) येथे नुकतेच अंतिम वर्ष पूर्ण केले आहे. विद्यार्थी प्रश्न मार्गी लावणयासाठी असलेली धडपड व सामाजिक कार्यात सहभाग लक्षात घेऊन विकास युवा प्रतिष्ठान अँण्ड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आकाश हिवराळे व प्रदेशाध्यक्ष प्रथमेश निकम यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्हाध्यक्ष तोषिश पाटील यांनी त्यांची निवड केली.
सामाजिक कार्यात युवावर्गाचा सहभाग व संघटना वाढीसाठी भर देणार तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थयांना रोजगार कसा उपलब्ध करुन देता येईल याबद्दल समिती प्रयत्न करणार असल्याचे मयूर सोनवणे यांनी सांगितले.