काश्मीरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत

श्रीनगर: वृत्तसंस्था । नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी काश्मीरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत, असा दावा केला आहे. त्या ऐवजी चीनने काश्मीरवर शासन करावे असे काश्मिरी लोकांना वाटत असल्याचे त्यानी म्हटले आहे.

प्रामाणिकपणे सांगायचे म्हटल्यास आश्चर्य वाटेल की आपण भारतीय आहोत असे सांगणार कोणीही सरकारला काश्मीरमध्ये आढळणार नाही, असे एका मुलाखतीत अब्दुल्ला म्हणाले. तु्म्ही या आणि तेथील कोणाशीही बोला, ते (काश्मिरी लोक) स्वत:ला भारतीय देखील मानत नाहीत आणि पाकिस्तानी देखील मानत नाहीत, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. गेल्या ५ ऑगस्टला त्यांनी (मोदी सरकार) जे केले, तो शवपेटीतील शेवटचा खिळा होता, असेही अब्दुल्ला पुढे म्हणाले.

काश्मिरी लोकांचा सरकारवर जराही विश्वास राहिलेला नाही. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानात जाणे सोपे होते, मात्र तेव्हा त्यांनी गांधींचा भारत निवडला, मोदींचा भारत निवडलेला नव्हता, असे फारूख अब्दुल्ला म्हणाले.

दुसऱ्या बाजूने चीन पुढे येत आहे. तुम्ही काश्मिरी लोकांशी बोललात, तर चीनने भारतात यावे असे अनेक लोक सांगतील. मात्र चीनने मुस्लिमांसोबत काय केले हे त्यांना माहितीही आहे. मात्र मी प्रामाणिकपणे हे सांगत आहे, मात्र लोक ते ऐकू इच्छित नाहीत, असे अब्दुल्ला म्हणाले.

फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जेव्हा केव्हा आपण भारताबाबत खोऱ्यात बोलतो तेव्हा आपले कोणीही ऐकत नाही. तेथे प्रत्येक गल्लीत एके-४७ घेतलेला सुरक्षारक्षक उभा आहे, असे सांगतानाच स्वातंत्र्य आहे कुठे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी येथे पुन्हा कलम ३७० लागू करण्याची आवश्यकता असल्याचे फारूख अब्दुल्ला यांनी लोकसभेत म्हटले होते. गेल्या ५ ऑगस्टला उचललेल्या पावलावर पुन्हा विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही अब्दुल्ला म्हणाले.

Protected Content