जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ममुराबाद रोडवरील मनुदेवी मंदीराजवळील वीट भट्टीजवळून तरूणाची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षल रघुनाथ सैदाणे (वय-२५) रा. कांचन नगर, जळगाव हा तरूण परिवारासह राहतो. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार २१ ऑगस्ट रोजी ममुराबाद रोडवरील मनुदेवी मंदीराच्या बाजूला असलेल्या विटभट्टीजवळ हर्षल सैंदाणे हा दुचाकी (एमएच १९ बीएफ ३११८) ने आला होता. त्याने दुचाकी तिथेच पार्किंगला लावली होती. काम आटोपून पुन्हा दुचाकीजवळ आला असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांने दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर बुधवार २४ ऑगस्ट रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे.