मनपा प्रशासन आणि ‘ केशवस्मृती सेवासंस्था समूहा’तर्फे ९९२४ सदस्यांचे सर्वेक्षण पूर्ण

जळगाव,प्रतिनिधी । जळगाव शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि त्याला बळी पडणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रणासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि ‘केशवस्मृती सेवासंस्था समूहा’तर्फे शहरात सुरू असलेल्या सर्वेक्षण आणि मार्गदर्शन उपक्रमात शनिवार, ११ रोजीपर्यंत २२४८ कुटुंबातील ९९२४ सदस्यांचे सर्वेक्षण आणि स्क्रिनिंगही पूर्ण करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेतांना त्यांच्या शरीराचे तापमान, प्राणवायूची मात्रा यांची नोंद घेऊन त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधांचे वितरणही करण्यात आले.अशा प्रकारच्या तपासणीचा हा चौथा दिवस होता.यासाठी ‘केशवस्मृती’च्या सुमारे २२ प्रकल्पातील ६० हुन अधिक सहकारी कार्यरत आहेत. या सर्वेक्षणप्रसंगी हे सर्व सहकारी आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत. त्यात आवश्यकतेनुसार काही ठिकाणी तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये त्यांनी पीपीई किटचाही वापर केला.यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्तेही सहभागी आहेत. ही सर्व माहिती महानगरपालिका प्रशासनाला सोपवली जाणार आहे.

Protected Content