मनपातर्फे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु ; मात्र निष्कृष्ट दर्जाचे (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । नुकताच पावसाळा सुरू झाला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम महानगरपालिकेतर्फे सुरू आहे. मात्र हे काम निष्कृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे चित्र आहे.

जळगाव शहर महापालिकेतर्फे गेल्या चार- पाच दिवसांपासून मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविले जात आहे , मात्र रस्त्यावर पडलेल्या लहान मोठे खड्ड्यांवर मातीमिश्रित बारीक कपची टाकली जात आहे , वरून डांबरचा मारा करून रोडरोलर फिरविले जात आहे. रस्ते बुजवताना योग्य प्रमाण असणे आवश्यक असते. तसे होताना दिसत नाही. शिवाय रस्ता बंद न करता खड्डे बुजविल्याबरोबर लागलीच चारचाकी , दुचाकी आणि जड वाहने धावत आहे . बुजवलेला खड्डे नेमके किती दिवस राहतील हाच प्रश्न नागरिकांना पडलेला दिसून येतोय. कुठलीच गुणवत्ता नसलेले हे काम वेगाने सुरू आहे. परंतू अत्यंत चालू काम आहे.दीर्घकाळ टिकणारे नाही. जास्त प्रमाणात माती मिश्रित दगडांचा बारीक चुरा ( कपची ) टाकण्यात येत असल्याने काही वाहने स्लिप होऊ शकतात तसेच प्रदूषण ही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी महापालिकेच्या आयुक्त आणि बांधकाम विभागाच्या अभियंतांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/598056207505128/

 

Protected Content