मनपाच्या सहकार्याने धर्मरथ फाउंडेशनतर्फे शिवाजी नगर प्रभागात सर्वेक्षण (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । धर्मरथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून शिवाजी नगर प्रभागात सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून जवळ पास रोज १०० घराचे तपासणी करून नागरिकांना या संदर्भात माहिती देऊन तपासणी करण्यात येत आहे.

शिवाजी नगर प्रभागात धर्मरथ फाउंडेशनतर्फे सर्वक्षण करण्यात येत आहे. यात फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, निशांत पाटील, हिरामन तरटे, प्रकाश मुळीक, संतोष भीताडे, भगवान सोनवणे, तुषार सूर्यवंशी, सागर बडगुजर, सुनील महांगडे, प्रमोद महांगडे, धर्मेंद्र चौधरी,मिलिंद बडगुजर,संजय अकोलकर, मनपा शिक्षक, मनपा अधिकारी व संस्थेचे पद्धधिकारी व सदस्य त्या संपूर्ण टीमचा सहभाग आहे. तरी राहिलेल्या शिवाजी नगर प्रभागातील नागरिकांनी तपासणी करून याचा लाभ घ्यावा ही धर्मरथ फाउंडेशनतर्फे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शिवाजी नगर प्रभागात लोकडाउन ७ ते १३ जुलै या काळात व अत्यावश्यक व रुग्णांच्या सेवेसाठी धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता असे संस्थेचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी कळविले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/875692659622348/

Protected Content