जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणपती नगरात इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या पाठीमागे १ कार व २ दुचाकी जाळल्याची घटना समोर शनिवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष मोहन तलरेजा (वय-४५) यांच्या मालकीच्या दोन दुचाकी (एमएच१९ डीआर ४४९८) व (एमएच १९ डीझेड ६६९८) त्यानंतर प्रितम थारुमल बठेजा (वय ५०) यांच्या मालकीची कार (एमएच १२ क्यूवाय १००७) मध्यरात्री जाळण्यात आली. ही वाहने घराच्या कंपाऊंडमध्ये पार्कींग केलेली होती. तलरेजा यांचे भाडेकरु चंकी वालेचा यांना पहाटे तीन वाजता वाहने जळत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच आरडाओरड केली. झोपलेले संतोष तलरेजा यांनी भाऊ सुशील यांना बोलावून जळत असलेली वाहने विझवली. त्यानंतर वाहने जाळणाऱ्याचा परिसरात शोध घेण्यात आला, मात्र संशयित फरार झालेला होता.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
तलरेजा यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक विजय शिंदे, रेवानंद साळुंखे व इतरांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याशिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. परंतु कुठेच काही मिळाले नाही. आधीच्या एका घटनेत विकृताने नशेत हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.