Home राजकीय मध्यप्रदेशच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे; कमलनाथ सावध भूमिकेत !

मध्यप्रदेशच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे; कमलनाथ सावध भूमिकेत !

0
25

भोपाळ वृत्तसंस्था । मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रात्री उशीरा सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले असून ते नाराज आमदारांना मंत्रीपद देऊन डॅमेज कंट्रोल करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

मध्यप्रदेश निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. तथापि, श्रेष्ठींनी कमलनाथ यांना प्राधान्य दिले. यानंतर लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर येत्या काही दिवसांमध्येच होणार्‍या राज्यसभा निवडणुकीतही शिंदे यांना तिकिट मिळणार नसल्याचे संकेत मिळाले होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांचे समर्थक मंत्री आणि आमदारांनी भाजपशी संपर्क केला आहे. यात तब्बल २८ आमदारांचा समावेश असून ते राजीनामा देऊन नंतर भाजपकडून निवडणूक लढू शकतात. अर्थात, यामुळे मध्यप्रदेशात सत्तांतर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिंदे समर्थकांच्या हालचाली पाहता, कमलनाथ यांनीदेखील सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने त्यांनी रात्री उशीरा सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले असून याला मंजुरीदेखील दिली आहे. आज ज्योतिरादित्य शिंदे हे बंडाची घोषणा करणार असतांना त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना मंत्रीपद देऊन कमलनाथ हे परत बोलावण्याची शक्यता आहे. अर्थात, ते डॅमेज कंट्रोल करण्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत. याबाबत येत्या काही तासांमध्ये हालचाली गतीमान होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound