मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा

फैजपूर तालुका यावल प्रतिनिधी । येथील मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यात यावा, या मागणीला साखर आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आता कारखाना 15 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीची १३ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मधुकर सहकारी साखर कारखाना लि.हा कारखाना आसवणी प्रकल्पासह १५ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. एफआरपी. देणेसाठी आवश्यक त्या रकमेइतकी भाड्याची आगाऊ रक्कम घेऊन प्रथम शेतकऱ्यांची १००% एफआरपी अदा करून कारखाना सुरू करावा या अटीचा समावेश ई-निविदेमध्ये करून कारखाना भाडेतत्वावर देण्याकरीता प्रसिद्ध करावयाच्या ई-निविदेचा मसूदा मंजूरीसाठी तात्काळ साखर संचालक कार्यालयास पाठविण्याच्या सूचना साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर यांनी २८ ऑक्टोबर रोजीच्या पत्राद्वारे कारखान्याचे चेअरमन/कार्यकारी संचालक यांना केली आहे.

Protected Content