अमळनेरात डिजीटल सातबारा उताऱ्याचे वाटप

अमळनेर प्रतिनिधी ।  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत सातबारा उताराऱ्याचे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.  यावेळी आमदार पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची, नवीन सुधारणांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.यावेळी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

Protected Content