इम्फाळ (वृत्तसंस्था) मणिपूर विधानसभेत मोठ्या गदारोळात मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीए सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
सभापतींच्या निर्णयाचा बचाव करीत सीएम बिरेन सिंह म्हणाले की, संख्याबळ असल्याने आम्ही जिंकलो. मुख्यमंत्री बीरेन सिंह म्हणाले, आम्ही आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. मुख्यमंत्री एन. बीरेनसिंग यांनी शुक्रवारी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. विरोधात असलेल्या काँग्रेसने अविश्वास ठराव आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मणिपूरमध्ये बराच काळ राजकीय वाद सुरु आहे. मतदानानंतर काँग्रेसच्या ६ आमदारांनी राजीनामा दिला आहे. मतदानापूर्वी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना व्हिप जारी केला. व्हीपमध्ये सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते.